वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एका व्यक्तीला बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांची (Bengaluru Traffic Police) पावती आली. पण संबंधित व्यक्तीने पुराव्याची मागणी करत पोलिसांनाच आव्हान दिले. पण त्यांना काही मिनिटांतच जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. बेंगळुरूच्या फेलिक्स राजला हेलमेट परिधान न केल्याबद्दल पावती देण्या आली. दंडाच्या रकमेला कंटाळून त्याने हे प्रकरण पोलिसांकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्विटरवर मिळालेल्या पावतीचा फोटो शेअर केला आहे. यात त्यांची नंबर प्लेट आणि त्यांचा फोटो दाखवण्याता आला होता. यात त्यांना हेल्मेट न घालता वाहन चालवताना दाखवण्यात आले होते.
सोशल मीडियावर ट्रॅफिक पोलिसांचे ट्विट व्हायरल - आता हटविण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये फेलिक्स राजने लिहिले आहे, 'नमस्ते @blrcitytraffic @BlrCityPolice मी हेल्मेट न घालण्यासंदर्भात कसलाही योग्य पुरावा नाही. कृपया योग्य फोटो दाखवावा. अथवा प्रकरण संपवा. यापूर्वीही असेच घडले होते. मात्र, मी केवळ चलान क्लिअर करण्यासाठी पैसे भरले होते. मी पुन्हा पैसे भरू शकत नाही.' यानंतर काही मिनिटांतच, पोलिसांनी हेल्मेट न घालता स्कुटरवरून फिरतानाचा त्याच फोटो अटॅच करून त्यांना उत्तर दिले.
अशा आल्या लोकांच्या रिअॅक्शन्स -रिअॅक्शन आल्यानंतर संबंधित व्यक्तीने लिहिले, 'पुराव्यासाठी धन्यवाद. एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येकालाच हे विचारण्याचा अधिकार आहे. यावर स्पष्टीकरण दिल्याबद्दल मी @blrcitytraffic चे कौतुक करतो. मी दंड भरेन. सर्व मीम कंटेट यूजर्सना खूप साऱ्या शुभेच्छा. बँगळुरू ट्रॅफिक.' बेंगरुळू ट्रॅफिक पोलिसांच्या प्रतिक्रियेनंतर, ट्विटर थ्रेडला नेटिझन्सकडून खुप साऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. एका युझरने लिहिले, 'प्रिय @blrcitytraffic आपल्याकडे असा एखादा कायदा (IPC सेक्शन) आहे? ज्याचा वापर करून, ज्या व्यक्तीने आपला वेळ बर्बाद केला त्या व्यक्तीला अधिक दंड करता येईल?'