VIDEO:कॉंग्रेस मुख्यालयात सापडले भाजपचे झेंडे; कार्यकर्त्यांमध्ये उडाली एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 02:43 PM2022-07-24T14:43:03+5:302022-07-24T14:44:37+5:30
कॉंग्रेसच्या मुख्यालयात असलेल्या भाजपाच्या झेंड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
लखनौ : भारताच्या राजकारणातील दोन राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय कॉंग्रेस यांच्यामधील राजकीय मतभेद जगजाहीर आहेत. मात्र लखनौमधील यूपी कॉंग्रेसच्या राज्य मुख्यालयातील एक व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. कारण लखनौमधील यूपी कॉंग्रेसच्या मुख्यालयात चक्क भाजपाचे झेंडे सापडले आहेत. स्थानिक नेत्यांनी याबाबत प्रत्यक्षपणे प्रतिक्रिया देण्यास टाळले. प्रदेश कार्यालयात सत्ताधारी पक्षाचे झेंडे आढळल्याने कॉंग्रेसच्या गोट्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कॉंग्रेसच्या मुख्यालयात असलेल्या भाजपाच्या झेंड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मॉल एव्हेन्यूवर येथ असलेल्या प्रदेश कॉंग्रेसच्या दुमजली मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर सोशल मीडियाचे कार्यालय आहे. हा व्हिडीओ कॉंग्रेसचे माजी नेते झीशार हैदर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आजूबाजूला असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र आश्चर्यचकित झालेल्या कार्यकर्त्यांना देखील हे झेंडे पाहून धक्का बसला आहे.
कॉंग्रेस मुख्यालयात सापडले भाजपचे झेंडे
कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अशोक सिंग यांनी सांगितले की, ते पाच दिवसांनंतर लखनऊमध्ये पोहचले असून त्यांना शनिवारी संध्याकाळी या प्रकरणाची माहिती मिळाली. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तर बीजेपी कडून सांगितले जात आहे की, "ज्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाचा कार्यभार आहे त्यांना ही दृश्ये पाहून याचा काहीच धक्का बसला नाही किंवा आश्चर्य वाटले नाही. या घटनेवरून काँग्रेसच्या स्थितीचे आकलन होऊ शकते."
#BJP (@BJP4India) flags were found in Uttar Pradesh #Congress (@INCUttarPradesh) state headquarters in #Lucknow and a video of the incident has gone viral on social media. pic.twitter.com/qrKezQLHId
— IANS (@ians_india) July 24, 2022
कार्यकर्त्यांमध्ये उडाली एकच खळबळ
लक्षणीय बाब म्हणजे "या घटनेचा कोणताही गाजावाजा होताना दिसत नाही. तसेच या घटनेबाबत काँग्रेस कार्यालयातील एकही पदाधिकारी बोलण्यास तयार नव्हता. एका तरूण नेत्याने सांगितले की, "आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. काही अज्ञात लोकांनी या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. " सोशल मीडियाचे हे कार्यालय आधी युवा कॉंग्रेसचे मुख्यालय होते.