Social Viral : सोशल मीडियावर नेहमीच मनोरंजनात्मक किंवा ज्ञानवर्धव माहिती देणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही याआधी सोशल मीडियावर रस्ता खचल्याचे किंवा रस्त्यावरील खड्ड्यांचे व्हायरल व्हिडीओ पाहिले असतीलच. त्यातच नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून वाहन चालकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर एका रस्त्याला अचानक भगदाड पडतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रस्ता अचानक खचल्यामुळे रस्त्याच्या मधोमध भलंमोठं भगदाड पडलं आहे. भरधाव वेगात रस्त्यवरुन धावणारी वाहने धावत असताना अचानक रस्ता खचतो आणि समोरुन येणारी चारचाकी कार खोल खड्ड्यात पडते. साधारणत २० फूट खोल खड्ड्यात कार कोसळते. या घटनेत कारचालक सुदैवाने बचावला आहे. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना देखील धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुरुवातीला या रस्त्यावरुन भरधाव वेगाने टेम्पो जातो. टेम्पोच्या दाबाने अचानक मध्येच रस्ता खचताना दिसतोय. त्यानंतर मागून येणारा एक कार चालक सावधगिरी बाळगतो. हा घडला प्रकार कोणालाच माहिती नसल्याने एकामागोमाग येणारा एका कारचालकाची गाडी या भल्यामोठ्या खड्ड्यात अडकते. हा सगळा प्रकार अगदीच भयंकर आहे. ही घटना घडताच रस्त्यावरुन जाणारी एक महिला कारचालक गाडी थांबवते आणि तातडीने खड्ड्यात फसलेल्या व्यक्तीची मदत करते आणि खड्ड्यात फसलेल्या व्यक्तीची सुखरूप सूटका करते. वाहन चालकांनी प्रवास करताना काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करावी, असं आवाहन या व्हिडीओमार्फत करण्यात आलंय.
पाहा व्हिडीओ -