कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये लॉकडाऊन किंवा काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. बिहारमध्येही १५ मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशात अत्यावश्यक कामांसाठीच सूट दिली जाते. त्यासाठी लोकांना ई-पास काढावी लागेल. आती ही पास मिळवण्यासाठी लोक कशा कशा आयडिया लावत आहेत. याचं उदाहरण पूर्णियाचे डीएम राहुल कुमार यांनी ट्विटमधून सांगितलं.
बुधावारी डीएम राहुल कुमार यांनी ट्विट करून लिहिले की, लॉकडाऊनवेळी ई-पास मिळवण्यासाठी लोकांकडून अर्ज येतात. त्यातील बरीच कारणे बरोबरही असतात. पण अशात काही अशी विचित्र कारणेही समोर येतात.
आपल्या ट्विटमध्ये राहुल कुमार यांनी एक अर्ज शेअऱ केलाय ज्यात ई-पास देण्याची अपील आहे. यात आजाराचं कारण सांगितलं आहे. पण आजाराचं कारण काय आहे तर चेहऱ्यावरील आणि कपाळावरील पिंपल्स. यावरच टीका करत राहुल कुमार यांनी लिहिले की, भाई तुझ्या पिंपल्सवर सध्या उपचार नाही केले तरी चालतील.
दरम्यान, बिहारमध्ये कोरोनाच्या केसेस वेगाने वाढत आहे. त्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणी केली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकांना आवाहन केलं होतं की, कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे नियमंचं पालन करा आणि सरकारला मदत करा.