शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

जीवाची पर्वा न करता लेकरांसाठी ढाल बनली आई; Video पाहून तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:48 PM

अंगावरून रेल्वे जात असताना या आईनं प्राणाची बाजी लावून आपल्या दोन लेकरांना वाचवलं...

Viral Video: रेल्वे प्रवासादरम्यान दरवाजाला टेकून उभे असताना, खांबाला धडकून किंवा ट्रेन पकडताना दुर्घटना होत असतात. काही वेळा प्रवाशांना या अशा दुर्घटनांमध्ये प्राणाला मुकावे लागते, तर काहीवेळा नशीब बलवत्तर असल्यामुळे प्रवाशी बचावतात. अशाच एका रेल्वेमधील घटनेचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. 

सध्या सोशल मीडियावर आईच्या निस्वार्थ प्रेमाची प्रचिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना बिहारमधील बाढ रेल्वे स्थानकावरील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका महिलेने आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी केलेली धडपड पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. धावत्या रेल्वेच्या कचाट्यातून तिने मुलांची सुखरूप सूटका  केल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे. आपल्या आईसोबत ही दोन मुले ट्रेनने प्रवास करत होती. यावेळी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने महिला तिच्या दोन मुलांसह पाय घसरुन रुळावर पडली. त्याच क्षणी समोरुन भरधाव वेगात ट्रेन येत होती. अशा वेळी रेल्वे रुळावर पाय घसरून पडलेल्या मुलांचा जीव वाचवण्याचे आव्हान या महिलेपुढे होते. आपल्या लेकरांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर होईल की काय? अशी भीती या मातेला सतावत होती. 

मिळालेल्या माहितीनुसार,रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेले लोक मदतीला धावतील तेवढ्यात ट्रेन आली. अशा परिस्थितीत आपल्या लेकरांना उदराखाली घेत या महिलेने शरीराची ढाल बनवून लेकरांचे रक्षण केले. रेल्वे आणि महिलेमध्ये अगदी काहीच इंचाचे अंतर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काळजाची धडकी भरवणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या महिलेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ज्या क्षणी रेल्वे फलाट सोडून पुढे मार्गस्थ झाली,  तेव्हा रेल्वे स्थानकावरील लोक या महिलेच्या मदतीसाठी पुढे सरसावले. 

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBiharबिहारrailwayरेल्वे