सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ धुमाकुळ घालत आहे. लोकांनी या व्हिडीओतील व्यक्तीला एवढी दुशने दिली आहेत की काही बोलू नका. या व्यक्तीने वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासलाच शिवाय दोन्ही हातात मोबाईलवर कॉल अटेंड करत मोटरसायकल चालवत असल्याने सगळे हैराण झाले आहेत.
वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना एखादा चालक दिसला की पोलीस त्याला बाजुला घेतात. दंडाची पावती हाती टेकवितात. अगदीच पोलीस तिथे नसले तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपून त्या वाहन चालकाला दंड आकारला जातो. ठीक आहे, हा वाहन चालक एकाच हातात मोबाईल घेऊन गाडी चालवत असतो. परंतू या व्हिडीओतील व्यक्ती दोन्ही हातात मोबाईल घेऊन मोटरसायकल चालवत असताना दिसत आहे.
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर अशाप्रकारचे बेजबाबदार लोक आपल्या मृत्यूस आणि दुसऱ्यांच्या त्रासाला निमंत्रण देत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी काही विशिष्ट कामांसाठीच वाहन चालविताना फोनचा वापर करण्यास सूट दिली आहे. या व्यक्ती तर त्याचीही खिल्ली उडविताना दिसत आहे. देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्यक्ती दोन्ही हात सोडून बाईक चालवत आहे. एवढेच नाही तर एका हाताने कानाला मोबाईल आणि दुसऱ्या हाताने दुसरा मोबाईल हाताळत आहे. त्याने हेल्मेटही घातलेले नाही.