आपल्याकडे कधी काय होईल सांगता येत नाही. देशातील अनेक ठिकाणांवरील गूढ गोष्टींचे किस्से आपण ऐकलेच असतील. कधी कुठे जमिनूतून अचानक पाणी येते, तर कुठे कोदकामात सोन्याचे हंडे सापडतात. आता असंच एक फ्रकरण समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील ओडिशा-बंगाल-झारखंड सीमेवरील लोकांना बन्सलोई नदी पात्रात सोनं सापडल्याची घटना समोर आली आहे. यामुले परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांनी सोनं लुटण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
या ठिकाणी रोज नागरिक सोनं शोधण्यासाठी गर्दी करत असतात.एका स्थानिक रहिवाशाच्या म्हणण्यानुसार, नदीच्या काठावर थोडीशी माती खोदताना सोनं सापडले. मात्र हे सोने अत्यंत कमी प्रमाणात होते. ते हुबेहूब जुन्या पैशासारखे दिसत होते आणि त्यावर काही प्राचीन अक्षरे किंवा खुणा होत्या. लोकांना ही बातमी कळताच सर्वजण इकडे तिकडे शोधू लागले. तो सोन्याचा धातू पाहून लोक थक्क झाले.
आलिया भटने वाढदिवसाला घातलेल्या गुलाबी सुंदर स्वेटशर्टची किंमत दिड लाख रुपये, एवढा महाग कारण...
काही नाणी चाकासारखी सोन्याची दिसत होती. यात काही भारतीय राजांची होती. दुसर्या स्थानिकाने सांगितले की हा हिंदू राजांच्या काळातील खजिना आहे तो नदीत बुडाला टाकला असल्याचे बोलले जात आहे. तीन दिवसांपासून शोधकार्यात गुंतलेले लोक स्थानिक आदिवासी मजूर आहेत आणि खजिन्याच्या शोधात वाळू उपसा करत आहेत. या सर्व लोकांसोबतच गावकरीही गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या साठ्याचा शोध घेत आहेत. हे सोने प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान, नदीच्या काठावर सापडलेले सोन्याचे नाणे मुरई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, बीरभूम जिल्हा प्रशासनाने अद्याप या प्रकरणात हस्तक्षेप केलेला नाही. दुसरीकडे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागालाही या शोधाची माहिती देण्यात आली आहे.