स्नो लेपर्ड (Snow leapord) म्हणजे हिमबिबट्या (Snow leapord video) ज्याला डोंगरातील बादशाहा किंवा माऊंटन घोस्टही (Ghost Of The Mountain) असंही म्हटलं म्हटलं जातं. बर्फाळ डोंगरात राहणारा हा बिबट्या. शिकार करताना तो इतक्या वेगाने आणि चपळपणे पळतो की पृथ्वीची चुंबकीय क्षमताही त्याच्यासमोर कमीच वाटते. अशा या बिबट्याला एका छोट्याशा पक्ष्याने चांगलाच चकवा दिला आहे.
व्हिडीओत पाहू शकता एक चिमणी आपल्यासाठी खाणं शोधते आहे. एका डोंगरावर ती बसलेली आहे. तिच्या अगदी जवळ एक स्नो लेपर्ड दबा धरून बसला आहे, हे तिला माहितीही नव्हतं. बिबट्या इतक्या शांतपणे बसला आहे की त्या पक्ष्याला तो दगड आहे की शिकारी हेच समजत नाही.
बिबट्या संधी साधून त्या पक्ष्यावर हल्ला करायला धावतो आणि पक्षी भुर्रकन उडून जातो. पक्ष्यालाही फसवणं सोपं नाही हेच या व्हिडीओतून दिसून येतो. हा व्हिडिओ आदित्य पांडा या युजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. हा भन्नाट व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट्स टाकल्या आहेत.