एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैशांचा पाऊस होताना तुम्ही पाहिलाय का? भलेही भारतात हे तुम्ही कधी पाहिलं नसेल. पण लंडनच्या बॉन्ड स्ट्रीट ट्यूब स्टेशनमध्ये असंच काहीसं झालंय. हा नजारा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. झालं असं की, इथे एका बिटकॉइनच्या मशीनमधून २० पाउंडच्या नोटांचा पाऊस होऊ लागला. लोकांनी लगेच ही घटना कॅमेरात कैद केली. आता या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Bond Street Bitcoin ATM spitting out tons of money! from r/Bitcoin
या २० सेकंदाच्या व्हिडीओ नोटाच नोटा दिसत आहेत. हा व्हिडीओ रेडीटवर शेअर करण्यात आलाय. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि शेअरही करत आहेत. काही लोक म्हणाले की, ही मशीन जॅकपॉटिंग बगच्या जाळ्यात अडकली. त्यामुळे पैसे असे बाहेर येत आहेत.
काय आहे पूर्ण प्रकरण?
रिपोर्टनुसार, जेव्हा बिटकॉइन ATM मशीनमधून अचानक पैसे येऊ लागले, तेव्हा एक सिक्युरिटी गार्ड लगेच तिथे आला. तर एक व्यक्ती काळ्या रंगाच्या बॅगमध्ये पैसे गोळा करत होता. नोटा इतक्या जास्त होत्या की, ती व्यक्ती हातांच्या ऐवजी पायांनी नोटा जमा करत होती.
का झालं असं?
ही मशीन तयार करणारी कंपनी पॉलिशने सांगितले की, कुणीतरी यातून भरपूर पैसे काढले असणार, ज्यामुळे मशीनमधून पैसे इतके पैसे येऊ लागले. दुसरीकडे बिटकॉइन टेक्नॉलॉजीचे मालक आणि सीईओ Adam Gramowski म्हणाले की, 'बघून असं वाटतंय की, यूकेतील छोट्या नोटा ठेवण्यास मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा'.