वॅक्सीन न घेणाऱ्यांनो, मास्क न लावणाऱ्यांनो तुम्ही प्रेरणा घेऊ शकाल अशी व्यक्ती सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. या व्यक्तीला आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यापाऱ्यांचा धंदा बुडाला. मात्र असे किती व्यापारी व दुकानदार आहेत जे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मास्क सक्ती करतात. आपण चांगल्या कार्याची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी असा आदर्श निर्माण करणारा वॅक्सिनेटेड चणावाला तुम्ही पाहिला आहे का? सध्या हा चाचा सोशल मिडियावर अनेकांच्या कौतुकाचा धनी ठरलाय. यामागे कारण आहे तो त्याचा मास्क आणि त्याच्या गळ्यातील खोक्यावरचा बोर्ड. चणे विकताना ही व्यक्ती अत्यंत जबाबदारीने चणे विकत आहे.
शिलाँगमधील हे चणेवाले काका नीट मास्क घालुन, बॉक्सवर वॅक्सिनेटेड हा बोर्ड लावूनच चणे विकत आहेत. आपल्या ग्राहकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून या चाचांनी व्हॅक्सिन घेऊन मास्कची खबरदारी घेऊन चणेविक्रीचा धंदा सुरु केला आहे. या काकांचा मुळ फोटो @indira_laisram या ट्विटर युजरनी शेअर केला आहे. त्याला आतापर्यंत चौदा हजाराच्या वर लाईक्स मिळाले आहेत.
अनेकजण हा फोटो रिट्वीट करत वॅक्सिनेटेड चणेवाल्याचे कौतुक करत आहेत. अनेक सरकारी ट्वीटर हँडलनीही वॅक्सीन न घेणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी या वॅक्सिनेटेड चणेवाल्याचा फोटो ट्वीट केला आहे. त्यात डिस्ट्रिक्ट अॅडमिनिस्ट्रेटर ऑफ हजारीबाग, डिस्ट्रीक टास्क फोर्स फॉर कोविड-१९ , खासी हिल्स, मेघालया यांनीही हा फोटो ट्वीट केला आहे.