कारण नसताना कुणाच्या वाट्याला जाऊ नये, कुणाला त्रास देऊ नये असं म्हणतात. पण तरीही तसं करणारे अनेक लोक असतात. मग अशा लोाकांना त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. कारण जैसी करनी वैसी भरनी! याचा प्रत्यक्ष अनुभव एका तरुणाने घेतला. त्याला त्याच्या चुकीची अशी शिक्षा मिळाली जी तो कधीच विसरणार नाही.
व्हिडीओत पाहू शकता, एक तरुण झाड पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने एका किकमध्ये झाड पाडलं खरं पण त्याच्या दुसऱ्याच क्षणी झाड तुटून त्याच्याच डोक्यावर पडलं. ज्या झाडाला त्याने लाथ मारली तेच झाड त्याच्या डोक्यावर पडून त्याला गंभीर दुखापत झाली. तरुण वेदनेने ओरडत जमिनीवरच पडला. झाडानेच या तरुणाला तिथल्या तिथं त्याच्या कर्माचं फळ दिलं.
होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटिझन्सनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. देव तुमच्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवतो, चांगलं करा किंवा वाईट प्रत्येक गोष्टीच फळ मिळतं, वनदेवतेने चांगला धडा शिकवला. अशी प्रतिक्रिया काही युझर्सनी दिली आहे.