क्रिकेटचा सामना असो वा टेनिसचा किंवा फुटबॉलचा. या सामन्यांमध्ये मैदानात खेळाडूंच्या खेळींची जेवढी चर्चा होते. तेवढीच चर्चा हे सामने बघण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांची सुद्धा होते. अनेकदा आपण बघतो की, सामन्यादरम्यान एखाद्या सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होतात तर कधी प्रेक्षकांच्या हातातील पोस्टर व्हायरल होतात.
असाच एक सीक्रेट असलेलं पोस्टर व्हायरल झालं आहे. मुळात हा मेसेज नसून या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेन्डची फार खाजगी गोष्ट जगाला सांगितली आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील हा फोटो असून ज्या व्यक्तीने हे पोस्टर पकडलंय त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डचं सीक्रेट सर्वांसमोर उघड केलंय. त्यामुळे त्याला गर्लफ्रेन्डकडून याची काय शिक्षा मिळाली असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता.
कॅरेबियन प्रीमिअर लीगचे सामने सध्या वेस्ट इंडीजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. अशाच एका सामन्यात या व्यक्तीच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आणि पाहता पाहता हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. इतकेच काय तर हा फोटो कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअरही करण्यात आला.
या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेन्डचं असं सीक्रेट उघड केलंय, ज्याचा तिने कधी विचारही केला नसेल. एकंदर असंच म्हणता येईळ की, त्याने तिचा विश्वासघात केलाय. आता त्याला जर गर्लफ्रेन्डने टीव्हीवर बघितलं असेल तर तुम्ही अंदाज लावूच शकता की, तिने काय केलं असावं.