Brain Teaser Image: मेंदुची कसरत करणारे अनेक क्वीज, पझल्स आणि ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. जे सॉल्व करण्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मजा येते. कारण यातून टाइमपासही चांगला होतो आणि तुमची आयक्यू टेस्टही होते. तुम्हालाही गेम्स खेळणं आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला चार पाण्याने भरलेले ग्लास दिसत आहेत. तुम्हाला 10 सेकंदात सांगायचं आहे की, यातील कोणत्या ग्लासमध्ये जास्त पाणी आहे.
फोटो जर बारकाईने पाहिला तर असंच दिसेल की, सगळ्याच ग्लासमध्ये पाणी सारखंच भरलेलं आहे. पण हेच तुमच्यासाठी चॅलेंज आहे. व्हायरल झालेल्या या ब्रेन टीजर फोटोत तुम्हाला चार ग्लास दिसत आहेत आणि चारही ग्लासमध्ये पाणी समान दिसत आहे. पहिल्या ग्लासमध्ये एक कात्री आहे, दुसऱ्या ग्लासमध्ये एक पीन आहे, तिसऱ्या ग्लासमध्ये इरेजर आणि चौथ्या ग्लासमध्ये एक घड्याळ आहे.
आता तुम्हाला 10 सेकंदात हे सांगायचं आहे की, यातील कोणत्या ग्लासमध्ये पाणी सगळ्यात जास्त आहे. तुम्ही जर थोडा जोर लावला तर 5 सेकंदातच तुम्ही उत्तर देऊ शकाल. जर अजूनही तुम्हाला बरोबर उत्तर सापडलं नसेल तर खालच्या फोटोत ते बघू शकता.
काय आहे बरोबर उत्तर
या पझलचं बरोबर उत्तर B ग्लास आहे. कारण कात्री, इरेजर आणि घड्याळ यांच्या तुलनेत पेपर क्लीप सगळ्यात कमी जागा घेते. हा प्रयोग तुम्ही घरीही करू शकता. जर तुम्ही सगळ्यात ग्लासमधील वस्तू एकएक करून काढाल तेव्हा तुम्हाला दिसेल की, सगळ्यात जास्त पाणी पेपर क्लीप असलेल्या ग्लासमध्येच आहे.