ही बातमी आहे चेन्नईची. इथे एका पोलिसाने एकट्याने चोरी करून पळून जात असलेल्या चोरांना कचाट्यात घेतलंय. चोर बाइकवरून पळून जात होते. तर पोलीस त्यांच्या मागावर होता. जसाही पोलिसाला चोरावर संशय आला ते बाइक घेऊन चोरांच्या मागे लागले. मग काय सिनेमात होतो तसाच सीन झाला.
पोलीस कर्मचाऱ्याने जेव्हा चोरांचा पाठलाग केला आणि त्यांना पकडलं तेव्हा त्यांच्याकडून ११ मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आलेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या पोलीस कर्मचाऱ्याने या चोरांना धरलं त्याचं नाव Antiln Ramesh आहे. झालं असं की, जशी रमेशने त्यांची बाइक बघितली तर त्याच्या लक्षात आलं की, चोरांच्या बाइकला नंबर प्लेट नव्हती. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, काहीतरी गडबड आहे. तेव्हा त्याला हेही दिसलं की, पेट्रोल टॅंकवरही कव्हर लावलं आहे.
यूट्यूबवर हा व्हिडीओ Grupo De Medios नावाच्या चॅनलने पोस्ट केला. यात दिसतं की, कशाप्रकारे तो चोरांशी एकटाच भिडतो. दोनपैकी एक चोर पळून जाण्यात यशस्वी ठरतो. तर दुसरा जो बाइक चालवत होता त्याला पोलिसाने बाइकवरील चोराला मोठ्या मेहनतीने पकडून ठेवलं. चौकशीतून समोर आलं की, चोरांची बाइकही चोरीची होती. ही गॅंग लोकांचे फोन आणि चेन खेचून पळतात.