अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, वाईट वेळ सांगून येत नाही. पण काही लोक असे असतात जे वेळ ओढवून आणतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीला गंमत इतकी महागात पडली की, कदाचित तो तसं पुन्हा करणार नाही. ब्राझिलियन कॉमेडीअन एका घटनेत जखमी झाला आहे. तो कॅमेरासमोर सुपरमॅन बनून स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता.
एका रिपोर्टनुसार ब्राझीलमधील प्रसिद्ध कॉमेडीअन लुइज रिबिरो डे एंड्रेजने सुपरमॅनचे कपडे घातले होते. तो रोडवर काहीतरी करत असताना त्याला मागून येणाऱ्या बसने टक्कर दिली. त्याने विचारही केला नसेल की, त्याला ही गंमत अशी महागात पडेल. सध्या त्याच्या स्थिती ठीक आहे. ही घटना ३० मे रोजी घडली होती.
लुइज ब्राझीलमध्ये सुपरमॅनच्या नावाने तसे कपडे घालून कॉमेडी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. लुईज कॅमेराकडे बघत असताना त्याला वाटलं की, बस येऊन त्याच्यामागे थांबेल, पण बसने त्याला जोरदार टक्कर दिली. तो करत असलेली गंमत दुर्घटनेत बदलली.
लुइजने 5News ला सांगितले की, त्याचा हा स्टंट फेल झाला. कारण बस ड्रायव्हरने बस थांबण्याच्या अंतराचा चुकीचा अंदाज लावला आणि त्याने मला बस ठोकली. ज्यामुळे मी खाली पडलो. बसमध्ये ब्रेकची काही समस्या नव्हती. मी माझा जीव वाचवण्यासाठी देवाचे आभार मानतो. यावरून हेच समजतं की, गंमत तोपर्यंतच ठीक आहे जोपर्यंत कुणाचं नुकसान होत नाही.