सध्या लॉकडाऊनमुळे अनेक महिलांनी सोशल मीडियावर वेगवेगळे पदार्थ दाखवायला सुरुवात केली आहे. युजर्सचा या व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळत असतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला चपाती कशी तयार करायची याबाबत शिकवताना दिसून येत आहे. पण हा व्हिडीओ सुरू असतानाच या महिलेच्या अंगावर सगळं पीठ उडालं. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
चीलीमधील सँटियागोच्या एंड्रेस पेर्कु एलेग्रियामध्ये एक महिला जेवण तयार तयार करत असताना व्हिडीओ काढत होती. पण हा जेवण बनवत असताना झालेली गडबड कॅमेरात कैद झाली आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीयोला ९ मिलियनेपेक्षा जास्त व्हिव्हज् मिळाले आहेत. ही महिला स्पॅनिश भाषेत बोलत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.(VIDEO: बाप रे बाप! एटीएममध्ये घुसला साप; ग्राहकांच्या डोक्याला नाहक ताप)
सुरुवातीला ही महिला चपातीचा गोळा घेऊन लाटायला सुरुवात करते. त्यानंतर लाटणं उचलल्यानंतर सगळं पीठ या महिलेच्या अंगावर उडतं हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की चपाती बनवायची नवीन पद्धत. या महिलेच्या अंगावर पीठ पडल्यानंतर ही महिला घाबरून व्हिडीओ बंद करायला सांगते. हा व्हिडीओ पाहून लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(लॉकडाऊनमध्ये आपल्या नजरेला ताण देऊन बघा; दिसतेय का जंगलात लपलेली मनीमाऊ?)