Viral : विमानतळावर काहीही विकत घ्यायचे म्हणले तर अंगावर काटाच येतो. कारण तेथे गोष्टी महागच असतात, आपल्या आवाक्याबाहेरच असतात हेच आपल्याला माहित आहे. पण आता एका पत्रकाराचे ट्विट व्हायरल होत आहे. ज्यात तिला वेगळा अनुभव आला आहे.
फराह खान या युझरने ट्विटरवर बिलाचा फोटो अपलोड केले आहे आणि लिहिले, 'मुंबईविमानतळावर दोन समोसा, एक चहा आणि एक पाण्याची बाटली याचे बिल केवळ ४९० रुपये. काफी अच्छे दिन आ गये है' असे ट्विट तिने केले आहे. यावर मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
फराह खानचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत टीकाही केली आहे. एका युझरने फराह खानवर टीका करत लिहिले, 'बाहेरच्या तुनलेत विमानतळावर मिळणाऱ्या गोष्टी महागच का असतात.याचे कारण विमानताळावर खूप जास्त भाडे आकारले जाते. अशा परिस्थितीत किंमती वाढवाव्याच लागतात. कोणतेही सरकार असो किंमती सारख्याच असतात. पत्रकारितेच्या नावावर अजेंडा चालवू नका.
कॅफे दिल्ली हाईट्स चे मालक सांगतात, 'विमानतळावरील आऊटलेट्सवर आमच्या प्रोडक्ट्सची किंमत तुलनेने १५ ते १८ टक्के जास्त असते. विमानतळावर जास्त भाडे आकारले जाते. अशा ठिकाणी रेस्टॉरंट चालवणे कठीण असते. सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्याच स्टाफला कामावर ठेवता येते. त्यांचा पगारही जास्त असतो. स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशनसाठीही अधिक खर्च येतो. या सर्व कारणामुळे विमानतळावर सर्व गोष्टी महागच असतात.