लग्ना समारंभात केला जाणारा डान्स म्हणजे वऱ्हाड्यांचे खास आकर्षण. त्यातही नवरानवरीचा डान्स पाहण्यासाठी तर लग्नातील मंडळी उत्सुक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. मात्र यात नवरी नवरा सोडून इतरच कोणासोबत तरी डान्स करतेय...
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेवाच्या सर्व भावांनी डान्स फ्लोअरवर नाचण्यासाठी एक ग्रुप बनवला आणि आणि ते नवरी-नवरदेवालाही डान्ससाठी बोलवत आहेत. पाहता पाहता लग्नाचं वातावरण आणखीच प्रसन्न होतं आणि नवरी आपल्या दिरांसोबत अन् नवरदेवासोबत थिरकताना आणि मस्ती करताना दिसते.
हा मजेशीर व्हिडिओ वेडिंग राइड इंडिया नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत लग्नातील हा व्हिडिओ 90 हजाराहून अधिकांनी पाहिला होता. दीर आणि वहिणीचा हा डान्स व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे. लोक हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. एका यूजरनं म्हटलं की हे दृश्य खरंच खूप मजेशीर आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं की दिर आणि वहिनीचं बॉन्डिंग पाहण्यासारखं आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.