शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
4
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
5
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
6
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
7
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
8
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
9
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
10
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
11
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
12
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
13
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
14
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
15
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
16
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
17
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
18
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
19
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
20
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

Shocking: नवरदेव मंडपात वाट बघत होता, नवरी अडकली होती लिफ्टमध्ये आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:26 AM

Bride Stuck in Lift : नवरी काही मुलं आणि नातेवाईकांसोबत लिफ्टमध्ये अडकली आहे. काही मिनिटांनी लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि आतील लोक बाहेर पळून येतात.

Bride Stuck In Lift: सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे लग्नाबाबत अनेक वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टी समोर येत असतात. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमधून समोर आली. लग्नासाठी निघालेली नवरी बिल्डींगच्या लिफ्टमध्ये अर्धा तास अडकली. महिला सोमवारी रात्री लिफ्टमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत अडकली होती. त्यानंतर बऱ्याच मेहनतीने तिला बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्लीपमध्ये लोक लिफ्टच्या दरवाज्याजवळ उभे असलेले दिसत आहेत आणि नवरीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नवरी काही मुलं आणि नातेवाईकांसोबत लिफ्टमध्ये अडकली आहे. काही मिनिटांनी लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि आतील लोक बाहेर पळून येतात.

छोट्या लिफ्टमध्ये श्वास गुदमरल्याने एका महिला धापा टाकत बाहेर आली. व्हिडिओत बघू शकता की, लिफ्टमध्ये अडकलेला एक मुलगा खुर्चीवर बसला आहे आणि त्यालाही श्वास घेण्यास त्रास होत आहे. लोक त्याला पाणी पाजत आहे. तर नवरीलाही या घटनेने मोठा धक्का बसलेला दिसतोय. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायंकाळी नवरी तिच्या तीन बहिणी आणि तिचे दोन अल्पवयीन नातेवाईक ग्राउंड फ्लोरवरून पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेले. पण बटन दाबल्यावर लिफ्ट पहिल्या मजल्यावर न पोहोचता मधेच थांबली. त्यामुळे लिफ्टमधील सगळे लोक घाबरले.

घटनास्थळी उपस्थित नवरीचे नातेवाईक आणि काही लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी मीरा भाईंदर नगर निगमच्या फायर ब्रिगेड बोलवण्यात आलं. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, बचाव दलाच्या जवानांनी लिफ्ट पहिल्या मजल्यावर आणली. ज्यानंतर आतील लोकांना बाहेर काढण्यात आलं. याआधीही अशा काही घटना समोर आल्या ज्यात लग्नाच्या दिवशी लोक लिफ्टमध्ये अडकले. सुदैवाने यातील सगळेजण सुरक्षित आहेत.

टॅग्स :thaneठाणेSocial Viralसोशल व्हायरल