लग्नात पाहुण्यांची मोठी यादी असते. वेगवेगळी तयारी केली जाते. कोणत्याही पाहुण्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. पण जेव्हा ठरल्याप्रमाणे लग्नाला पाहुणे येत नाहीत तेव्हा खाण्या-पिण्यापासून सगळ्याच गोष्टी वाया जातात. लग्नाची पार्टी अटेंड न करणाऱ्या अशाच एका पाहुण्याला नवरीने १७ हजार रूपयांचं बिल पाठवलं आहे. या बिलाची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यावर वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत.
'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, यूकेतील एका लग्न समारंभादरम्यान नवरीने तिच्या लग्नासाठी सर्वच व्यवस्था केल्या होत्या. नवरीने प्रति दोन पाहुण्यांवर १७५ डॉलर म्हणजे १७ हजार रूपये खर्च केला होता. अशात जेव्हा आमंत्रण असूनही पाहुणे रिसेप्शन पार्टीला पोहोचले नाही तर नवरीने वाया गेलेल्या वस्तूंची पैसे वसूल करण्यासाठी पाहुण्याच्या घरीच बील पाठवलं. सोशल मीडिया साइट रेडीटवर रिसेप्शन पार्टी अटेंड न करणाऱ्या पाहुण्याने नवरीकडून पाठवण्यात आलेल्या इनवॉइस कॉपी शेअर केली. या इनवॉइसच्या शीर्षकात लिहिलं आहे की, 'no call, no Show guest'. यासोबतच खाली लिहिलं आहे की, लग्नाच्या रिसेप्शन डिनर अटेंड केलं नाही. दोन सीट रिकाम्या होत्या, ज्यामुळे त्यांना बिल पाठवण्यात आलं आहे. (हे पण वाचा : बाबो! या तरुणीने तर कळसंच केला, नवऱ्याशिवाय केलं लग्न, पाहुण्यांना बोलवलं अन् घातली हिऱ्यांची अंगठी)
इनवॉइसच्या नोट्स सेक्शनमद्ये लिहिलं आहे की, 'हे बिल तुम्हाला द्यावं लागेल, कारण तुम्ही आधी आम्हाला फोन करून सूचना दिली नाही की, तुम्ही पार्टीला येणार नाही. त्यामुळे हे बील तुम्हाला लवकरच भरावं लागेल'. या इनवॉइसवर हेही लिहिलं आहे की, 'तुम्ही ऑनलाइन पेमेंट जेल किंवा पॅपेलच्या माध्यमातून करू शकता. कृपया आम्हाला संपर्क करा आणि आम्हाला सांगा की बिल कसं पे कराल. धन्यवाद'.