सध्या सोशल मिडियावर आपण लग्नाचे अनेक व्हिडिओज पाहु शकतो. या व्हिडिओजमध्ये अनेक असे प्रसंग असतात जे धक्कादायक असतात, काही आपल्याला इमोशनल करतात तर काही हसायला लावतात. अशाच अनेक व्हिडिओंपैकी एका नवरानवरीचा जरा हटके व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात एका नवरीने तिच्याच नवरदेवाला पाण्यात ढकलून दिलंय. का बरं? पाहा व्हिडिओ...
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता, नवरदेव आणि नवरीचं फोटोशूट (Wedding Photo-shoot) सुरू आहे. या फोटोशूटसाठी पाण्यात एका छोटा स्टेज बनवण्यात आला आहे. व्हाइट गाऊनमध्ये उभी असलेली नवरानवरी पोज देण्याचा सराव करत आहेत. इतक्यात फोटोग्राफर नवरी-नवरदेवाच्या जवळ येऊन त्यांना पोज शिकवू लागतो. मात्र, फोटोग्राफर नवरदेवाच्या जवळ जात त्याला पोज शिकवू लागताच नवरी त्या दोघांनाही धक्का देऊन पाण्यात पाडते.
हा व्हिडिओ पाहून नेचकरी पोट धरून हसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत.