बहुतेकदा लोक लग्नात बराच खर्च करण्याचा प्रयत्न करतात. लग्नात दिखावा करून सगळ्यांच्याच नेहमीच लक्षात राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण असेही काही लोक आहेत ज्यांना लग्नात अगदी सोप्या पद्धतीने लग्न करायचे आहे, कारण त्यांना लग्नात अतिरिक्त पैसे खर्च करणे हे पैशाचा अपव्यय आहे असं वाटतं. अशा परिस्थितीत साधेपणाने पार पडलेल्या लग्नाने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत.
हा फोटो आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहेत, ज्यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा वरात घोड्यावर किंवा कारमध्ये नाही तर इलेक्ट्रिक बाईक वर येते. जेव्हा वधूने वराला तुळशीची माळ घातली. तेव्हा ती तुळशीची जयमाला होती, एक अप्रतिम इको वेडिंग. माधुरी आणि आदित्य तुम्हाला खूप शुभेच्छा! ”. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. बोंबला! टिव्हीवर लाईव्ह होती रिपोर्टर; अचानक कुत्र्यानं हातातला माईक खेचला, अन् मग.... पाहा व्हिडीओ
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रात दिसलेल्या जोडप्याचे नाव माधुरी आणि आदित्य आहे. हे दोघे शाळेपासूनचे मित्र आहेत, जे आता लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. हे दोघेही निसर्गप्रेमी 'नेचर लवर' असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या लग्नातील सजावटीच्या बहुतेक गोष्टी इको फ्रेंडली आणि रीसायकल होत्या. त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे वरातीत त्यांनी आपल्या इलेक्ट्रिक सायकलवरून मिरवणुकीसह मंडप गाठले आणि वधू-वरानी तुळशीच्या पानांची बनलेली एक वरमाला घातली. काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS म्हणाले....