(Image Credit- News Bust, Twitter)
सिवनी : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा नमुना पाहायला मिळयाचं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं जातआहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेला पूल उद्घाटनाआधीच पडला आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात अति मुसळदार पाऊस झाल्यानं वैगगंगा नदीवरील कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेला पूल काही क्षणात खाली पडला आहे. विशेष म्हणजे हा पूल एका महिन्यापूर्वी वापरासाठी तयार झाला होता. आतापर्यंत या पुलाचं औपचारीक उद्घाटन झालं नव्हतं. तरीही लोकांनी या पुलाचा वापर करायला सुरूवात केली होती. सध्या सोशल मीडियावर या पुलाचा पडण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे ३ कोटी ७ लाख रुपये खर्च करून हा पूल तयार करण्यात आला होता. १ सप्टेंबर २०१८ ला या पुलाचं काम सुरू झालं. हे काम पूर्ण होण्याची तारीख ३० ऑगस्ट होती. त्याआधीच हा पुल तयार करण्यात आला. त्यानंतर गावातील लोकांनी या पुलाचा वापर करायला सुरूवात केली. पण उद्घाटनाआधीच पूल पडला . स्थानिक जिल्हाधिकारी राहुल हरिदास यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेबाबत तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाणार आहे.
सिवनी केवलारी विधानसभेअंतर्गत हा पुल येतो. या मतदारसंघाचे आमदार राकेश पाल आहेत. पुल पडल्यानं आजूबाजूच्या गावातील लोकांचा वाहतुकीसाठी त्रासाचा सामना करावा लागत आहे. पुल निर्माण एजंसीवर प्रशासन कशाप्रकारे कारवाई करतं याकडे सर्वाचचं लक्ष आहे. वैनगंगा नदीवरील हा पूल सुनवारा आणि भीमगढ या गावांना जोडतो. मध्यप्रदेशात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली.
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ९ जिल्ह्यांमधील ३९४ पेक्षा जास्त गावांमध्ये पूरस्थिती उद्भवल्याचे सांगितले आहे. या महापूरात अडकलेल्या ७ हजारापेक्षा जास्त लोकांचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांन सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. पूरग्रस्त लोकांच्या जेवणाची, औषधांची आणि अत्यावश्यक वस्तू पुरवण्याची व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले.
हे पण वाचा-
अरे व्वा! हवेतील कोरोनाच्या प्रसाराला रोखता येणार; लसीनंतर रशियानं तयार केलं अनोखं मशिन
खूशखबर! कोरोना लसीचे काऊंटडाऊन सुरु; 'Covishield' 42 दिवसांत मिळू शकते
हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा