केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्रत्येकासाठी काहीतरी देण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. दरम्यान, लोक प्राप्तिकरातील बदलांची सर्वाधिक वाट पाहत होते, परंतु केवळ निराशाच झाली.
यंदाही कराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या क्रिप्टोकरन्सीबाबत सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून होते. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणाऱ्यांना मात्र मोठा झटका लागला आहे. सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर ३० टक्के कर लावण्याची मोठी घोषणा केली आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सोशल मीडियावर मध्यमवर्गीयांबाबत मीम्स व्हायरल होत आहेत. करात सवलत न मिळाल्यानंतर सर्वसामान्यांची आणि नोकरदारांची अवस्था काही सारखीच आहे. अर्थसंकल्पाबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, त्यावर अनेक मीम्स शेअर केले जात आहेत.