असं म्हणतात मुर्ती लहान पण किर्ती महान. फक्त माणसांच्याच बाबतीत ही म्हण खरी ठरत नाही पुढील व्हिडिओ पाहिल्यावर प्राण्यांच्या बाबतीतही ही म्हण खरी ठरते हे आपल्याला पटेल. प्राणी दुर्बल असला म्हणजे तो कमकूवत आहे असा समज चुकीचा आहे हे पुढील व्हिडिओ सिद्ध करतो. जगंलाचा राजा असलेल्या बलाढ्य सिंहाला म्हशीनं असा काही धडा शिकवलाय जे पाहुन तुम्हाला या जंगलाच्या राजाची कीव आल्याशिवाय राहणार नाही.
हा व्हिडिओ Kruger Wild Animals या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. यात एकदा नाही तर अनेकवेळा म्हशीने सिंहाला शिंगावर उचलून हवेत फेकलं आणि त्याला अद्दल घडवली (Buffalo threw the lion in air). व्हिडिओमध्ये म्हशीने सिंहाचा पराभव केल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. सध्याच्या व्हिडिओमध्ये दिसतं की सिंहाने शांत उभा असलेल्या म्हशीला आपली ताकद दाखवण्याता प्रयत्न केला. सिंह म्हशीला घाबरवायला गेला. यानंतर म्हैसही भडकली आणि तिने सिंहाला आपल्या शिंगावर उचलून जमिनीवर आपटलं. म्हशीने एकदा नाही तर अनेकवेळा सिंहाला उचलून आपटलं. सिंह स्वतःला सावरून उभा राहण्याचा प्रयत्न करताच म्हैस त्याला पुन्हा हवेत फेकत होती. एकंदरीतच म्हशीसोबत पंगा घेणं सिंहाला चांगलंच महागात पडल्याचं दिसतंय.
जंगली म्हशीबद्दल असं म्हटलं जातं की त्या अतिशय शक्तिशाली असतात. या म्हशी कळपात असतील तर सिंहदेखील त्यांच्यापासून दूर राहतो. मात्र, तरीही ते कधी समोरासमोर आले तर म्हैस सिंहालाच धडा शिकवते. त्यामुळे सिंह म्हशीची शिकार करायला गेलाही, तरीही लहान पिल्लांचीच शिकार करतो. तो मोठ्या म्हशींपासून लांबच राहाणं पसंत करतो.