मुंबई - उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. तसेच ते आपल्या अकाऊंटवरून मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ लोकांनाही खूप आवडतात. आताही आनंद महिंद्रांनीसोशल मीडियावर एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची चर्चा होत आहे. (A buggy was running without a horse on the road, Anand Mahindra gave it a special name while sharing the video)आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर रस्त्यावरून धावणाऱ्या एका बग्गीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या बग्गीचं वैशिष्ट्य म्हणजे ही बग्गी घोड्याविना धावत होती. हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी १९७२ मधील सुपरहिट चित्रपट व्हिक्टोरिया नंबर २०३ वरून या बग्गीला एक विशेष नावही दिले. आनंद महिंद्रांनी घोड्यांविना धावणाऱ्या या बग्गीचे नामकरण व्हिक्टोरिया ई-२०३ असे केले आहे.
आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्हिक्टोरिया बग्गी घोड्याविना पळताना दिसत आहे. या व्हिडिओला पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हालाही ही बग्गीच असल्याचे भासेल. मात्र नंतर संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यास तुम्हाला ही बग्गी नसून बॅटरीवर धावणारी कार असल्याचे दिसून येईल.