शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

बैलाने महिलेलाल पायाखाली अक्षरश: तुडव तुडव तुडवलं, व्हिडिओ पाहुन तुमचा होईल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 10:43 AM

एका बैलाच्या हल्ल्याचा (Bull attack)  व्हिडीओ (Bull attack video) सोशल मिडियावर व्हायरल  झाला आहे. ज्यात बैलाने एका महिलेवर हल्ला केला (Bull attack on woman) आहे. बैलाने महिलेला आपल्या पायांखाली अक्षरशः तुडव तुडव तुडवलं आहे.

बैल (Bull) हा पाळीव प्राणी असला तरी तो चवताळला तर त्याच्यासमोर येणाऱ्याचं काही खरं नाही. सध्या अशाच एका बैलाच्या हल्ल्याचा (Bull attack)  व्हिडीओ (Bull attack video) सोशल मिडियावर व्हायरल  झाला आहे. ज्यात बैलाने एका महिलेवर हल्ला केला (Bull attack on woman) आहे. बैलाने महिलेला आपल्या पायांखाली अक्षरशः तुडव तुडव तुडवलं आहे.

गुजरातच्या जामनगरमधील ही घटना आहे. हा बैल इतका पिसाळलेला होता की तो महिलेवर हल्ला करतच राहतो. तिला तुडवत राहतो. इतर लोकांनाही तो जुमानत नाही. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत पाहू शकता एक महिला रस्त्याने जात होती. तेव्हा तिथं तिच्यासमोर एक बैल आला. सुरुवातीला बैल तिच्याकडे पाहत उभा राहिला. महिलेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा बैल रागात आहे आणि तो आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे हे तिला समजलं. त्यामुळे ती तिथून पळ काढू लागली.

पण बैलाने तिचा पाठलाग केला. बैल तिच्यामागे पळत सुटला. त्याने तिला गाठलं आणि तिच्यावर हल्ला केला. ज्या जागेवरून महिला पळत गेली तिथंच त्या बैलाने तिला मारत परत आणलं. सुरुवातीला तो तिला आपल्या शिंगांनी आणि नंतर पायांनी मारताना दिसतो आहे. भिंतीच्या कडेला एक बाईक उभी आहे, त्या बाईकच्या जवळ भिंतीच्या कडेला बैल तिला मारत नेतो. त्यानंतर तो तिला तसंच मारत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो.

महिला जीवाच्या आकांताने ओरडते. मदतीसाठी याचना करते. तिचा आरडाओरडा ऐकून एक तरुणी तिथं धावत येते. ती त्या महिलेला बैलाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करते. पण बैल तिलासुद्धा ढकलून देतो. महिलेला वाचवण्याचा तरुणीचा प्रयत्न कितीतरी वेळा अपयशी होतो. शेवटी ती कुणालातरी बोलवण्यासाठी जाते. इतक्यात तिथं काही आणखी लोक जमा होतात.  लोक त्या बैलाला मारून त्याला बाजूला हटवण्याचा प्रयत्न करतात. पण बैल इतक्या माणसांनाही घाबरत नाही तो महिलेला काही सोडत नाही. शेवटी तिथून गेलेली एक तरुणी आणखी काही माणसांना आणते आणि हातात एक काठी घेऊन येते. ज्याने ती बैलाला मारून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते.

कसंबसं करून महिलेला त्या बैलाच्या तावडीतून सोडवलं जातं. महिलेची अवस्था बैलाने अत्यंत भयंकर केली आहे. महिलेची हालचालही होत नाही आहे. ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाWomenमहिलाGujaratगुजरात