मुक्या प्राण्यांना जरी बोलता येत नसलं तरी भावना व्यक्त करता येतात. त्यासाठी ते कृतीची भाषा वापरतात. मालक त्यांच्यावर जितकं प्रेम करतो त्याहुनही कैक पटीने अधिक प्रेम ते मालकावर करतात. याचाच प्रत्यय देणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात बैलाच्या जोडीनं मालकाला कसं वाचवलं याचं प्रत्यंतर येतं.
शासनाने बैलागाडाला शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यावर या शर्यती सुरु झाल्या. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये अशीच एक बैलगाडा शर्यत सुरु असताना एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. काय आहे ही घटना हे खालील व्हिडिओत पाहा.
शर्यत जोरदार सुरु होती. एन रंगात आली होती. बैलांची जोडी वेगाने पळत येत होती. इतक्यात बैलजोडीचा घोड्यावर स्वार असलेला मालक घोड्यावरुन कोसळला. पुढे मालक बैलांच्या पायांनी तुडवला जाणारा इतक्यात त्याच्या बैलजोडीनं मालकावरुन उंच उडी मारत मालकाचे प्राण वाचवले. मालक स्वत: ला सावरत बाजूला झाला. बैलांच्या या प्रसंगावधनाच सर्वांकडून कौतुक होत आहे.