इंटरनेटवर असे अनेक व्हिडीओ आहेत जे कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणतात आणि भावूक करतात. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. केरळमधील एक बस चालक आणि दोन मुलांचा हा गोंडस व्हिडीओ आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओचे लोकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम युजर favaseeyy ने शेअर केला होता. यामध्ये एक बस चालक दोन मुलांना बिस्किट आणि खाऊची काही पाकिटे देताना दाखवण्यात आला आहे. व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसतसे त्या माणसाचे दयाळू हावभाव मुलांच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसून येतात. चिमुकल्यांचं गोड हास्य आपलं मन जिंकतं.
"आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक लोकांना भेटू. आपल्या सर्वांसाठी सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे भूक भागवण्यासाठी लोक काहीही करतात. आपल्याला मिळालेली ही फार मोठी कृपा आहे, असेही म्हणता येईल. भूक म्हणजे काय हे आम्हाला माहीत नाही" असं या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
मुलांचा हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून बस चालकाचं कौतुक करत आहेत. लोकांनी ड्रायव्हरच्या दयाळू वर्तनाचं कौतुक केलं आणि त्याच्या परोपकारातून प्रत्येकाने कसा धडा घेतला पाहिजे यावर भाष्य केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"