आपण रेस्टॉरंटमध्ये डोसा मागवल्यानंतर त्यासोबत सांबारही दिले जाते. बिहारमध्ये एका रेस्टॉरंटला डोशासोबत सांबार न देणं महागात पडले आहे. जिल्हा ग्राहक आयोगाने आता रेस्टॉरंटला ३५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण १५ ऑगष्ट २०२२ चे आहे. बिहार येथील जिल्हा मुख्यालयात असलेल्या बंगाली टोला येथील रहिवासी मनीष पाठक यांनी शहरातील एका रेस्टॉरंटमधून मसाला डोसा पॅक घरी आणला.
या ऑर्डरसाठी त्यांनी १४० रुपये दिले होते. घरी पार्सल आणल्यानंतर मनीष यांना कळाले की रेस्टॉरंटने डोशासोबत सांबार दिले नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी मनीष तक्रार करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. यावेळी त्यांना रेस्टॉरंटमध्ये उडवा-उडवीची उत्तर दिली.
नवरदेव लपवत होता त्याचं टक्कल, नवरीकडील लोकांनी ठिकाणावर आली त्याची अक्कल
रेस्टॉरंटने यावेळी आपली चूक मान्य करण्याऐवजी रेस्टॉरंटच्या संचालकाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यानंतर त्याने १४० रुपयांत संपूर्ण रेस्टॉरंट खरेदी करता येणार नसल्याचे सांगितले.
यानंतर त्यांनी वकिलाकडून रेस्टॉरंटला नोटीस पाठवली, पण त्यांनाही याचे योग्य उत्तर मिळू शकले नाही. यानंतर त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार केली.
या प्रकरणी आयोगाचे अध्यक्ष कम निवृत्त न्यायाधीश वेदप्रकाश सिंह आणि सदस्य वरुण कुमार यांनी तक्रार योग्य असल्याचे आढळून आल्यावर रेस्टॉरंटला नुकसान भरपाई ठोठावली आहे. त्यांनी रेस्टॉरंटला सेवेतील कमतरतेसाठी २००० रुपये आणि वॉर्ड खर्च म्हणून १५०० रुपये म्हणजेच फिर्यादीला एकूण ३५०० रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. ही रक्कम ४५ दिवसांत द्यावी लागेल. या कालावधीत रक्कम न दिल्यास आणखी आठ टक्के व्याज द्यावे लागेल, असंही ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे.