सॅन फ्रोन्सिस्कोमध्ये एका कॅब ड्रायव्हरने तरूणींना मास्क लावण्यास सांगितले तर त्यांनी त्याच्यासोबत गैरव्यवहार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका महिला तिच्या दोन मैत्रीणींसोबत कॅबमध्ये बसली. यानंतर कॅब ड्रायव्हरने त्यांना मास्क लावण्याची विनंती केली. तर त्यांना राग आला आणि त्यांनी ड्रायव्हरसोबत गैरवर्तन केलं.
एक महिला तर सर्वातआधी ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर जोरात खोकली. त्यानंतर ड्रायव्हरला त्यांनी घाणेरड्या शिव्याही दिल्या. इतर दोघांनी त्यांचेही मास्क काढले. तर त्यांनी ड्रायव्हरचा मास्कही काढला. इतकेच नाही तर त्यातील एका महिलेने सांगितले की, ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. असं म्हणून तिने ड्रायव्हरची खिल्ली उडवली. ही संपूर्ण घटना गाडीतील कॅमेरात कैद झाली.
हा व्हिडीओ एबीसी७ ची रिपोर्टर डायोन लिमने तिच्या इन्स्टाग्रामव शेअर केला आहे. तिन्ही महिलांनी कॅब ड्रायव्हर खूप त्रास दिला. एकीने तर ड्रायव्हरचा फोनही घेतला होता. अखेर काही वेळाने तिघीही कॅबमधून उतरल्या. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी सांगितले की, ते या घटनेची चौकशी करत आहे. लवकरच तिन्ही महिलांविरोधात कारवाई केली जाईल.