सोशल मीडियावर अनेकदा काही मजेशीर गोष्टी व्हायरल होत असतात. कोरोनाच्या या कठीण काळात सोशल मीडियावर लोक हसणे आणि हसवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. अशातच सोशल मीडियावर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्या फोटोत एका दुकानाबाहेर असलेली भन्नाट सूचना लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. जी पाहून तुम्हीही दिलखुलासपणे हसाल.
व्हायरल होणाऱ्या या सूचनेत लिहिलंय की, “जर माझ्या दुकानाचं शटर बंद असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही आत्म्याप्रमाणे इथेच कुठेतरी भटकत आहोत” सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होताच आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला. त्यासोबत गंमतीदार रिप्लाय देत म्हटलंय की, या भटकती आत्म्याचा लवकरच पोलिसांची भेट होईल असं त्यांनी लिहिलं आहे.
सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. लोक एकमेकांना हा फोटो शेअर करत आहे. त्यासोबत मजेदार कमेंट्सही करत आहेत. या फोटोला आतापर्यंत २ हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, आता त्याचा आत्मा जेलमध्ये भटकेल. तर दुसऱ्या या आत्म्याला शांती लाभो असं म्हटलं आहे.
नव्या रुग्णांचा ४५ दिवसांतील नीचांक
देशात शनिवारी कोरोनाचे १ लाख ७३ हजार ७९० नवे रुग्ण आढळून आले. गेल्या ४५ दिवसांतील हा नीचांक आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून शनिवारी २ लाख ८४ हजार ६०१ जण या संसर्गातून बरे झाले व ३६१८ जणांचा बळी गेला. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ इतकी असून त्यातील २ कोटी ५१ लाख ७८ हजार ११ जण बरे झाले. देशात सध्या २२ लाख २८ हजार ७२४ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत व बळींची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ५१२ इतकी झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९०.८० टक्के आहे.
जगभरात १७ कोटी १ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी २० लाख रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ३५ लाख ३८ हजार जणांचा बळी गेला आहे. जगात १ कोटी ४४ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेमध्ये ३ कोटी ४० लाख रुग्ण आहेत. त्यातील २ कोटी ७७ लाख जण बरे झाले आहेत तर ५६ लाख ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या देशात कोरोनामुळे ६ लाख ८ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये १ कोटी ६३ लाख कोरोना रुग्ण आहेत व ४ लाख ५९ हजार लोकांचा बळी गेला. ही संख्या भारतातील बळींपेक्षा अधिक आहे.