गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर वन्य प्राण्याचे अनेक फोटो व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सोशल मीडियावर सध्या हत्तीच्या कळपाचा फोटो खूप व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी वाइल्डलेंस इको फाउंडेशन (WildLense Eco Foundation) ने एक फोटो पोस्ट केला होता.
त्यात एकापेक्षा जास्त हत्ती होते. विशेष म्हणजे या फोटोत हे हत्ती एकामागेएक उभे राहून नदीतील पाणी पीत होते. दावा केला जात आहे की या फोटोमध्ये सात हत्ती आहेत. लोकांच्या मनात हत्तीच्या संख्येबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. हत्तींची संख्या नेमकी किती आहे. याचा विचार सोशल मीडिया युजर्स करत आहेत. कारण पहिल्यांदा पाहिल्यानंतर फक्त ४ हत्ती दिसून येत आहेत.
सोशल मीडिया युजर्सनी या फोटोचं कौतुक केलं आहे. कारण फोटोग्राफरने हत्तींचा फोटो योग्यवेळी टिपला आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. शेकडो लोकांनी या फोटोला लाईक केलं असून एकाच फ्रेममध्ये चार हत्ती दिसून येत आहेत.
वाइल्डलेंस इको फाउंडेशनने या हत्तींचा फोटो पुन्हा शेअर करत या फोटोत नेमके किती हत्ती आहेत. याबाबत माहिती दिली आहे.
एका संस्थेने या व्हिडीओमध्ये एका शॉटमध्ये सात हत्ती असल्याचे सांगितले आहे. शेवटपर्यंत व्हिडीओ पाहिल्यानंतर दिसून येतं की या एका फ्रेममध्ये ७ हत्ती आहेत.
कोरोना व्हायरसबाबत WHO चा पुन्हा इशारा, तरूणांना दिला 'हा' सल्ला!
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी