बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही. बरं तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीला दिसू शकते. यात काही जादू वगैरे नाही, पण आपल्या बघण्याची पद्धत याला कारणीभूत असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत एक मांजर आहे, पण ती लगेच दिसून येत नाही. लोक तर ही मांजर शोधून शोधून हैराणही झाले आहेत.
Came home from running errands. Couldn't find my cat... until... from r/funny
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक काळ्या रंगाची मांजर लपली आहे. जर तुम्हाला ती दिसली तर स्वत:लाच शाब्बास म्हणा. हा फोटो Ciarra Debritto नावाच्या एका रेडीट यूजरने शेअर केला आहे. आधी तर लोक हा फोटो पाहून कन्फ्यूज झाले पण नंतर त्यांना काही वेळाने मांजर दिसली. ते म्हणतात ना कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होतीं......