सोशल मीडियावर नेहमीच असे काही फोटो व्हायरल असतात की, लोक तासंतास त्या फोटोंकडे बघत असतात. कारण त्या फोटोत नेमकं काय आहे हेच त्यांना कळत नसतं. म्हणजे जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही. म्हणजे हे फोटो ऑप्टिकल इल्यूजनचे असतात. काही दिवसांपूर्वी एका मांजरीचा फोटो व्हायरल झाला होता. आता एका बेडकाचा फोटो व्हायरल झाला आहे. पण गंमत ही आहे की, तो फक्त बेडकाचा फोटो नाहीये.
बालपणी उल्टा-पुल्टा करत साधू आणि सरदारजींचा फोटो अनेकदा पाहिला असेल. असाच हा फोटो आहे. यात फोटोत पहिल्या नजरेत एक बेडूक दिसतं. पण यात फक्त बेडूक नाही. यात आणखी एक प्राणी लपलाय.
मजेदार बाब म्हणजे हा प्राणी बेडकापेक्षा आकाराने कितीतरी मोठा आहे. हीच या फोटोची गंमत आहे. अनेकजण या बेडकाकडे अनेक तास बघत राहिले पण काहींना तो प्राणी शोधण्यात यश आलं तर काहींना नाही.
आता थोडं खाजवावं लागलं आणि एकसारखं बघावं लागलं तर फायदा तुमचाच आहे. म्हणजे तुमचा मेंदू किती फास्ट आहे आणि तुमची नजर कशी चांगली आहे हे यातून कळून येईल. पण ज्यांना अजिबातच मेहनत घ्यायची नसेल तर आणि लगेच उत्तर हवं असेल तर खाली उत्तर देत आहोत.
या फोटोची गंमत ही आहे की, सरळ पाहिलं तर तुम्हाला फक्त बेडूक दिसेल, पण मान उजव्या बाजूला वाकवून फोटो बघाल तर तुम्हाला घोड्याचा चेहरा दिसेल.