सोशल मीडियावर (Social Media) यूजर्सना बुचकळ्यात टाकणारे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यात प्राण्यांचे फोटो जास्तीत जास्त व्हायरल (Viral Photo) होत असतात. वाइल्डलाईफ फोटोग्राफर्सकडून काढण्यात आलेले फोटो तर इतके कमाल असतात की, लोक डोकं खाजवत तासंतास बसतात पण फोटोतील बिबट्या काही दिसत नाही. असाच एका फोटो व्हायरल झालाय ज्यात एक बिबट्या लपलेला आहे. फोटोग्राफर सौरभ देसाई यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. बर्फवृष्टीनंतर डोंगरावर पडलेल्या बर्फाजवळ एक बिबट्या दिसला, तो फोटोग्राफरशिवाय कुणीही सहजपणे शोधू शकला नाही.
त्यांनी इतर काही अविश्वसनीय फोटोसोबत विशे फोटो शेअर करत लिहिलं की 'हे हिम बिबट्यांचे फोटो खूप दूरपर्यंत पोहोचले आहेत आणि मला आनंद आहे की, लोकांना या फोटोत बिबट्या शोधण्यात मजा येत आहे'. त्यांनी #findthesnowleopard आणि #snowleopard हॅशटॅग दिले. पहिल्या फोटोत डोंगरात एक बिबट्या लपला आहे. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर लगेच बिबट्याला शोधायला लागा.
इन्स्टाग्रामवर शेअऱ करण्यात आलेला बिबट्या एका रिकाम्या जागेवर लपलेला दिसत आहे. इतर आश्चर्यजनक फोटोचा आनंद घेण्यासाठी फोटोग्राफर द्वारे शेअऱ केलेले फोटो स्वाइप करून बघू शकता. हे फोटो पाहिल्यावर तुमच्या तोंडून 'वाह' असंच निघेल. हे फोटो इन्स्टाग्रामवर @saurabh_desai_photography नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.