Puzzle Story: आज आम्ही तुमच्यासाठी एक पझल घेऊन आलो आहोत. बालपणी तुम्ही आजी-आजोबांकडून अनेक कथा ऐकल्या असतील, अनेक पझल सॉल्व केले असतील. पण आम्ही जे पझल तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तेही काही कमी नाही. हे पझल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. हे पझल सॉल्व करण्यात कित्येकजणे अपयशी ठरले आहेत. अनेकांनी वैतागून नाद सोडला. मात्र, काही लोकांनी पझल सॉल्व केलं.
९९ टक्के लोक उत्तर देण्यात फेल
या फोटोत तुम्हाला एक कुलूप आणि एक किल्ली दिसत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही फार जीनिअस आहात तर तुम्ही हा फोटो व्यवस्थित बघून सांगा की, यात कोणत्या भाजीचं नाव लपलं आहे. तुम्हाला क्लू देत आहोत की, ही भाजी हिरव्या रंगाच असते आणि या भाजीचे आरोग्याला खूप फायदेही होतात. अनेक लोकांना हा फोटो अनेकदा पाहिला, खूप विचार केला पण ते यात लपलेल्या भाजीचं नाव काही सांगू शकले नाहीत.
तुम्ही सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक पझल्स सॉल्व केले असतील. अनेक फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधल्या असतील. पण हे पझल सॉल्व करता करता अनेकांना घाम फुटला. तसे तर आपण नेहमीच कठिण प्रश्नाचं उत्तर सहजपणे देऊन टाकतो, पण अनेकदा असंही होतं की, सोप्या प्रश्नाचं उत्तरही देता येत नाही. हा फोटो तसाच काहीसा आहे. पुन्हा पुन्हा बघूनही लोक याचं उत्तर देऊ शकत नाहीयेत. मात्र काही लोक काही मिनिटातच याचं उत्तर देत आहेत.
फोटोत लपलं आहे पझलचं उत्तर
जर तुम्ही कुलूपाचा इंग्रजी शब्द Lock आणि चावीचा Key शब्द एकत्र कराल तर तुम्हाला या पझलचं उत्तर सहजपणे मिळेल. आता जरा शांतपणे विचार करा म्हणजे तुम्हाला त्या हिरव्या भाजीचं नाव आठवेल. जर तुम्हाला उत्तर आलं असेल तर तुम्ही कमाल आहात. पण ज्यांना अजूनही समजलं नाही त्यांना सांगतो की, याचं बरोबर उत्तर (लॉक+की) म्हणजे 'लौकी' आहे.