Optical Illusion :सोशल मीडियावर वेगवेगळे पझल्स आणि गेम्स व्हायरल होत असतात. यांचे फोटो शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंज देत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहून लोक कन्फ्यूज होतात. कारण यात असलेल्या गोष्टी शोधणं फार अवघड आणि मजेदार असतं. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पण यावेळचा ऑप्टिकल इल्यूजन फोटो फारच वेगळा आहे. यात तुम्ही परीक्षा सुरू असताना कॉपी करणारा मुलगा शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी शोधणं हे एक मोठं चॅलेंज असतं. यातील गोष्टी सहजपणे दिसत नाही तर त्या तुम्हाला शोधाव्या लागतात. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत काही विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे दिसत आहे. तर शिक्षिका एका बाजूला उभी राहून त्यांच्यावर लक्ष देत आहे. सुरूवातीला फोटो पाहिल्यावर असं वाटतं की, प्रत्येक विद्यार्थी काहीतरी करत आहे. पण मुळात असं नाहीये.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. कधी या फोटोंमध्ये काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी दोन फोटोंमधील फरक शोधायचे असतात. पण या फोटोत जरा वेगळेपणा आहे. दिसायला जरी सोपं वाटत असलं तरी यातील चॅलेंज अवघड आहे. पण जर तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही हे चॅलेंज लगेच पूर्ण करू शकाल.
जर तुम्हाला यातील कॉपी करणारा मुलगा दिसला असेल तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तो कोण आहे हे तुम्ही बघू शकता. या मुलाच्या हातावर उत्तरं लिहिली आहे. ते बघून तो पेपर लिहित आहे.