सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होत असतात जे सोशल मीडिया यूजर्सना बुचकळ्यात टाकत असतात. ऑप्टीकल इल्यूजनचे फोटो लोकांना फारच हैराण करतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की, आपल्या समोर असलेल्या गोष्टीही आपल्याला दिसत नाही. किंवा समोर जे दिसतं ते तसं नसतं तर भलतंच काहीतरी असतं. अशा गोष्टी बघितल्या की, लोक थक्कही होतात आणि त्यांचा विश्वासही बसत नाही. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत काही भलेमोठे दगड आहेत आणि त्या दगडांमध्ये एक जंगली मांजर लपली आहे. ही मांजर शोधून शोधून लोक थकले आहेत.
The US Fish and Wildlife Service ने हा फोटो शेअर केला असून लोकांना या फोटोतील जंगली मांजर शोधण्यास सांगितले आहे. आता काहींनी चांगला प्रयत्न केला त्यांना ही लपलेली जंगली मांजर दिसली तर काहींना यश आलं नाही. तुमचीही नजर चांगली असेल तर तुम्हीही टेस्ट म्हणून यात जंगली मांजर शोधू शकता. हा फोटो नेवाडाच्या जंगलातील असल्याचं सांगितलं जात आहे.
१५० पेक्षा जास्त लोकांना या पोस्टवर रिप्लाय दिला. पण त्यातील एकाच व्यक्तीला ही जंगली मांजर आढळून आली. Nevada Department of Wildlife (NDOW) नुसार या जंगली मांजरी राहण्यासाठी अशाच दगडी जागांची निवड करते.
न्यूयॉर्कमधील पत्रकार Kate Hinds यांनी हा फोटो आधी शेअर केला होता आणि आपल्या मित्रांना यातील प्राणी शोधण्याचं चॅलेंज दिलं होतं. या पोस्टला ४३ हजार ६०० रिट्विट मिळाले तर १९८,८०० लाइक्स मिळाले आहेत.