लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला एका जंगलाचा फोटो दाखवणार आहोत. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या जंगलामध्ये एक मांजर लपलेलं आहे. तुम्हाला हे मांजर कुठे आहे ते शोधायचं आहे. फक्त दोन मिनिटं तुम्ही आपल्या नजरेला आणि डोळ्यांना ताण देऊन पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की या जंगलातील मांजर नेमकी कुठे बसली आहे.
सोशल मीडियावर हा फोटो आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी शेअर केला आहे. या फ्रेममध्ये मांजरीला शोधून दाखवा असं कॅप्शन फोटोला देण्यात आलं आहे. कारण जंगलात मांजरी खूप कमी प्रमाणात दिसून येतात. माश्यांची शिकार करत असलेल्या मांजरींना पाण्याच्या जवळपास राहायला आवडतं. हा फोटो हिमालयाच्या आसपासच्या परिसरातून काढला आहे. (हे पण वाचा-Video : मोराला उडताना पाहून कोरोनाचा सगळा ताण विसरून जाल, पाहा नयनरम्य दृश्य)
वर्ल्ड वाईल्ड फोर नेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा मांजरी सुंदरबनच्या मायग्रोवनाच्या जंगलात किंवा हिमालयाच्या परिसरातील गंगा किंवा ब्रम्हपुत्रा नद्यांच्या भागात दिसून येतात. या फोटोवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (हे पण वाचा-शोरूममध्ये हस्तमैथुन करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया...)