एका फोटोमुळे सध्या इंटरनेटवरील लोक चक्रावून गेले आहेत. कारण त्यांना एका फोटोत बिबट्या शोधायचा आहे, पण तो दिसत नाहीये. अनेकांनी डोळ्यात तेल घालून बिबट्याचा शोध घेतला पण त्यांना काही त्यात यश आलं नाही. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमची नजर चांगली आहे. तर एकदा फोटोतील सर्व ठिकाणांवर लक्ष द्या आणि बघा तुम्हाला बिबट्या दिसतो का. तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की बिबट्या दिसेल.
लोकांच्या डोळ्यांना धोका देणारा हा फोटो आहे. झालं काय की, बिबट्याचा रंग आणि या ठिकाणी वाळलेल्या गवताचा रंग सारखाच आहे. त्यामुळे अनेकांना लगेच तो दिसून येत नाहीये. त्यात तो उभा नाहीये. लपून बसलाय. त्यामुळे शोधायला अधिकच अडचण येतीय. पण हार मानून कसं चालेल. प्रयत्न तर करावे लागतीच ना?
हा फोटो दिल्लीत राहणारा ३४ वर्षीय फोटोग्राफर अनिभन गर्ग याने क्लिक केला आहे. त्याने हा फोटो जयपूरमध्ये अरावली डोंगरांचा दौरा करताना काढला होता.
असंही म्हटलं जात आहे की, जेव्हा त्याने हा फोटो क्लिक केला होता. तेव्हा त्यालाही हे माहीत नव्हतं की, त्याने एका बिबट्याला कॅमेरात कैद केलं. हे त्याला घरी जाऊन फोटो लॅपटॉपमध्ये बघितल्यावर समजलं.