लॉकडाऊनमध्ये घरी बसून तुम्ही जर वैतागला असाल डोळ्यांचा व्यायाम होण्यासाठी एक मस्त प्रकार आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. घरात इकडून तिकडे पळणारी पाल दिसली तर आपल्याला खूप राग येतो. पण फोटोतील पाल शोधायची म्हणजे गंमत वाटते. या फोटोत एक पाल लपून बसली आहे. या जमिनीवर लपलेली पाल शोधण्यासाठी तुम्हाला डोळ्यांना ताण द्यावा लागणार आहे.
हा फोटो सोशल मीडियावर @Afro_Herper या युजरने शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता जमिनीवरील पाल शोधणं हे सोपं काम नाही. सगळं समान असल्याप्रमाणे दिसत आहे. या जमिनीवरची पाल शोधणं हा तुमच्यासाठी मोठा टास्क आहे. हा फोटो दिनासॉन नॅशनल पार्कचा आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही सुद्धा हे चॅलेन्ज पूर्ण करून पाहा.
याआधीही सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला होता. यात वाघांची संख्या शोधायची होती. बीगबींनी सुद्धा या फोटोवर कमेंटस केल्या होत्या. त्यानंतर हा फोटोला तुफान प्रतिसाद दिला होता.
CoronaVirus: रेल्वे स्टॉलवर आता मास्क, सॅनिटायझर, उशा, बेडरोल आणि टॉवेलही मिळणार