सध्या लॉकडाऊनमुळे माणसं घरात बंद आहेत, त्यामुळेच निसर्गाच बदलेलं रुप सगळ्यांनाच पाहायला मिळत आहे. प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा मुक्त संचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसात प्राण्याचे आणि पक्ष्याचे अनेक फोटो, व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. आजही असाच एक व्हायरल फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा फोटो घुबडाचा आहे. झाडाच्या खोडावर एक घुबड बसलेलं आहे. घुबड अनेक ठिकाणी अपशकून तर काही मोजक्या देशात शकूनाचं प्रतिक मानलं जातं.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या फोटोला 'द ग्रेट घुबड' असं कॅप्शन दिलं आहे. कारण हे घुबड झाडामध्ये लपून बसलं आहे. त्यांनी आपल्या फॉलोअर्सना फोटोतील घुबडाला शोधण्याचं आवाहन केलं आहे. हा फोटो २०१९ मधील असून ब्रिटेनच्या एका वाईल्डलाईफ फोटोग्राफरने कोलंबियातील जंगलात फिरत असताना हे दृश्य टिपलं आहे.
या फोटोमध्ये सुंदर घुबड दिसून येत आहे. खासकरून घुबडाचे डोळे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोग्राफरचं नाव एलन मर्फी आहे. सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केल्यानंतर या फोटोला ९० रिट्विट्स आले असून ९०० पेक्षा जास्त लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.
Video : बिकीनीतील तरूणीने पाण्यात उडी तर घेतली, पण त्यानंतर जे घडलं ते बघून बघतंच राहिले लोक...
बाबो! उंच मुलींना रोज कशा अडचणींचा सामना करावा लागतो, हेेच दाखवणारे Hilarious फोटोज....