या फोटोने सोशल मीडियावरील काही लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. या फोटोतील झुडपात एक वाघ लपलेला आहे. पण तो काही कुणाला दिसत नाहीये. या फोटोतील वाघ शोधणं लोकांसाठी फारच अवघड झालं आहे. मात्र, काही लोकांची नजर कमालीची चांगली असल्याने त्यांनी यातील वाघ शोधला. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतूनही काही सुटत नाही तर तुम्हीही यातील वाघ शोधा. ते म्हणतात ना, प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतं.
हा फोटो सोशल मीडियावर Sanctuary Asia ने शेअर केला आहे. या फोटोने लोकांना कन्फ्यूज केलंय. हा शानदार फोटो मिझोराम राज्यातील डम्पा टायगर रिझर्व सॅंक्चुरीमधील एका कॅमेरात कैद करण्यात आलाय. (हे पण बघा : या फोटोतील झुडपात लपला आहे बिबट्या, लोक शोधून शोधून थकले पण दिसेना; तुम्ही ट्राय करा!)
बारकाईने बघा या झुडपात तुम्हाला लगेच वाघ दिसणार नाही. तुम्हाला जास्त बारकाईने झुडपांमध्ये त्याला शोधावं लागतं. वरून डाव्या कोपऱ्यात बघाल तर तिथे तुम्हाला वाघाची झलक दिसते. एका ट्विटर यूजरने हा वाघ शोधून त्याला गोल सर्कल करून फोटो शेअर केला आहे. खरंच या फोटोत वाघ शोधणं अवघड आहे.
हा एक ऐतिहासिक फोटो आहे. कारण केवळ फोटोग्राफ नाही तर सात वर्षात मिझोरामच्या डम्पा टायगर रिझर्व्हमध्ये टायगरचा पहिला फोटोग्राफीक रेकॉर्ड आहे. हा गोल्डन फोटो कॅप्चर करणारा कॅमेरा ट्रॅप फॉरेस्ट गार्ड जखुमा डॉनने लावला होता. या कॅमेरा ट्रॅप फेब्रुवारी महिन्यात लावला होता आणि मे महिन्यात काढण्यात आला. ज्यातून वाघाचा हा शानदार फोटो समोर आला.