अनेक सोशल मीडियावर असे फोटो समोर येतात जे बघून डोकं चक्रावून (Optical Illusion Video) जातं. काही लोक असे काही प्रश्न विचारतात की, कन्फ्यूज व्हायला होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Viral Video) चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत एक घोडा (Horse Video) चालत आहे. तुम्हाला हे सांगायचंय की, घोडा पुढे जातोय की मागे जातोय.
@DattaDamayanti या यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलंय की, घोडा कोणत्या बाजूने जात आहे, मागे की पुढे? जर तुम्हाला दिसत असेल की, घोडा पुढे जात आहे तर तुम्ही लेफ्ट ब्रेन पर्सन आहात म्हणजे विश्लेषणात्मक, लॉजिकल आणि फॅक्ट ओरिएंटेड. जर राइट ब्रेन पर्सन (क्रिएटीव्ह, ज्ञानी आणि खुल्या विचारांचे) असाल तर तो तुम्हाला मागे जाताना दिसेल.
एक यूजर म्हणाला की, आधी त्यांना वाटत होतं की घोडा मागे जात आहे. नंतर त्यांना वाटलं की, घोडा पुढे जात आहे. यांच्याकडे कोणता ब्रेन आहे? यावर एक यूजरने कमेंट केली 'कन्फ्यूज्ड'.
लोकांनी हेही विचारलं की, यामागे काय अभ्यास आहे? ज्याचं उत्तर कुणी देऊ शकलं नाही. आम्हालाही हे असं का आहे यांचं उत्तर माहीत नाही. फक्त हा व्हिडीओ लोकांना कन्फ्यूज करतोय हेच सांगतोय. बघा आणि सांगा घोडा पुढे जात आहे की मागे?