कॅन्सरसारख्या आजारामुळे फक्त एक व्यक्ती नाही तर अख्ख कुटुंब उद्ध्वस्त होतं. मात्र अशा परिस्थितीत कुटुंबाची साथ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांची साथ असेल तर आजाराशी झुंज देणाऱ्या व्यक्तीला देखील बळ मिळतं आणि आशा वाटू लागते. याच दरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका कॅन्सरग्रस्त आईने आपल्या चिमुकल्याला पाहिलं तेव्हा ती भावूक झाली.
चिमुकल्याला भेटल्यानंतर, त्याला प्रेमाने जवळ घेतल्यानंतर तिला खूप बळ मिळाले. त्यामुळे ती आता पुन्हा कॅन्सरशी लढायला तयार झाली. सोशल मीडियावर महिलेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर नात्यांचं महत्त्व नक्कीच समजेल. @goodnews_movement या Instagram अकाऊंटवरून अनेकदा पॉझिटिव्ह व्हिडीओ पोस्ट केले जातात.
अशाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक महिला कॅन्सरचा सामना करत आहे आणि अनेक दिवसांनी तिची तिच्या लहान मुलासोबत भेट होत आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या लहान मुलाला मिठी मारून रडते. त्याला प्रेमाने जवळ घेऊन त्याच्यावर मायेने हात फिरवते. महिलेचे केस गेले आहेत आणि ती सुद्धा खूपच वीक दिसत आहे. केमोथेरपीमुळे हे झाल्याचं म्हटलं जात आहे.