रस्त्यावर होणारे अपघातामुळे सामान्यपणे आपल्याला दु:खच होतं. मात्र, गेल्या मंगळवारी फीनिक्स, एरिझोनामध्ये असं काही घडलं जे बघून आश्चर्यही वाटेल आणि आनंदही वाटेल. रस्त्याच्या मधोमध दोन गाड्यांची जोरदार टक्कर झाली. याचवेळी एक कपल त्यांच्या बाळाला घेऊन रस्ता क्रॉस करत होतं. चांगली बाब ही आहे की, गाड्यांच्या अगदी जवळ असूनही सुदैवाने तिघांचा जीव आश्चर्यकारका वाचला. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.
मृत्यू बनून समोरून येत होती जीप
ज्यावेळी कपल बाळाला स्ट्रोलरमध्ये ठेवून रस्ता क्रॉस करत होतं. त्याचवेळी एका कार वेगाने सिग्नल तोडून त्यांच्याकडे आली. हा समोरून येणारा मृत्यू होता. त्यांच्याकडे येणारी भरधाव कार पाहून कपल घाबरलं. पण पुढच्याच सेकंदाला दुसऱ्या बाजूने येणारी एक कार जीपला जाऊन भिडली. जोरदार टक्कर झाली आणि दोन्ही गाड्या जागेवर थबकल्या.
कपल आणि बाळाला इजा नाही
चांगली बाब ही आहे की, दोन्ही गाड्यांच्या इतक्या जवळ असून सुद्धा नशीबाने कपल आणि बाळ सुखरूप होतं. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज फीनिक्स पोलीस विभागाने जारी केलाय. हा १३ सेकंदाचा व्हिडीओ बातमी लिहेपर्यंत ७७२ हजार लोकांनी पाहिला, तर ३ हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला. रेड लाइट सिग्नल तोडणाऱ्या जीपच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली. तर दुसऱ्या कार ड्रायव्हरचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे.