जगात अनेक प्रकारचे लोक आढळतात, काहींची वागणूक नम्र असते, तर काही लोकांना त्यांच्या वाईट वागणुकीमुळे कुठेही मान मिळत नाही. काही लोक गरीब लोकांशी गैरवर्तन करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच समोर येत असतात. जे पाहून युजर्स संताप व्यक्त करतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर एक महिला आलिशान कारमध्ये पेट्रोल भरताना दिसत आहे. ती आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असल्याचं दिसतं. पेट्रोल भरल्यानंतर कार चालकाने गैरवर्तन केले. नीट हातात पैसे देण्याऐवजी गाडीतील व्यक्तीने तिच्या अंगावर पैसे फेकले आणि नोटा जमिनीवर पडल्या.
कारचालकाचं गैरवर्तन
महिला कर्मचारी शांतपणे ते पैसे उचलू लागते. त्यानंतर तो कारचालक तेथून निघून जातो. पैसे घेतल्यानंतर ती महिला उभी राहते आणि तिच्यावर झालेल्या अशा वाईट वागणुकीमुळे तिच्या डोळ्यात अश्रू येतात. हे पाहिल्यानंतर युजर्सही नाराज झाले आहेत. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीवर टीका करत आहे.
व्हिडीओ झाला व्हायरल
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर दोन लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ चीनमधला असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच असे सांगितले जात आहे की, जेव्हा स्थानिक मीडियाने कारचालकाला शोधून काढले आणि त्याला घटनेबद्दल विचारले तेव्हा त्याने मला नोटा जमिनीवर फेकून द्यायच्या नव्हत्या पण त्यावेळी खूप घाईत होतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"