शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

या फोटोत दडलंय मांजर! पाहा तुम्हाला शोधता येतंय का? अनेक नेटिझन्सना सापडलंच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 7:58 PM

सोशल मीडियावर सध्या अशाच एका मांजराचा फोटो व्हायरल (Hidden cat viral image) होतो आहे. खरं तर हा एका घराच्या बॅकयार्डचा फोटो आहे, मात्र याच ठिकाणी एक मांजरही दडलंय. या फोटोतील मांजर शोधण्याचा (find cat in backyard) प्रयत्न शेकडो नेटिझन्स करत आहेत.

मांजरी किती अतरंगी आणि मस्तीखोर असतात हे सर्वांनाच माहिती आहे. अगदी ज्यांच्या घरी मांजर पाळलेली नाही त्यांनादेखील याबाबत माहिती असेल. इंटरनेटवर मांजरांनी केलेल्या करामतींचे कित्येक व्हिडिओ शेअर (Viral cat videos) होत असतात. यात बऱ्याच वेळा मांजर हे अगदी विचित्र ठिकाणी जाऊन बसलेलं दिसून येतं. कधी घराच्या छतावर, तर कधी छोट्याशा बॉक्समध्ये. मांजरांची ही कुठंही जाऊन बसण्याची सवय त्यांच्या मालकांसाठी मात्र भरपूर डोकेदुखी ठरते. सोशल मीडियावर सध्या अशाच एका मांजराचा फोटो व्हायरल (Hidden cat viral image) होतो आहे. खरं तर हा एका घराच्या बॅकयार्डचा फोटो आहे, मात्र याच ठिकाणी एक मांजरही दडलंय. या फोटोतील मांजर शोधण्याचा (find cat in backyard) प्रयत्न शेकडो नेटिझन्स करत आहेत.

‘There is no cat in this image’ नावाचं एक प्रसिद्ध ट्विटर अकाउंट आहे. या अकाउंटवरून अशा प्रकारचे फोटो शेअर केले जातात, ज्यात घरातील मांजर विचित्र ठिकाणी दडलेलं असतं. नेटिझन्स त्या फोटोंमधून दडलेलं मांजर (Find cat hidden in image) शोधतात. या अकाउंटवरून पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये मांजर चट्कन दिसून येतं. मात्र, एक फोटो असा आहे ज्यामध्ये मांजर शोधताशोधता हजारो नेटिझन्सच्या नाकीनऊ आलं आहे. या फोटोला आतापर्यंत सहा हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

काय दिसतंय फोटोमध्ये?या फोटोमध्ये एका घराचं बॅकयार्ड म्हणजे मागचं अंगण दिसत आहे. यामध्ये एक छोटंसं शेड, व्हीलबॅरो, बाक, कुंड्या अशा गोष्टी दिसत आहेत. मागे एक लाकडी कुंपण आहे. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड शहरातील एका घराचा हा फोटो आहे. या घराच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, ‘रिकी’ नावाची मांजर (Ricky cat hide and seek) ही याच फोटोमध्ये कुठेतरी दडली आहे. मात्र, हजारो नेटिझन्सदेखील तिला शोधू शकलेले नाहीत. कित्येकांनी ‘मी हार मानतो’, ‘मांजर नेमकी कशी दिसते हेच मी विसरलो’, ‘बहुतेक ती खिडकीमध्ये आहे’ अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. ही मांजर सापडल्याचा दावादेखील अनेकांनी केला आहे, मात्र त्यांनाही याबाबत खात्री नाही.

हिंट हवीये?तुम्हीदेखील आतापर्यंत या मांजराला शोधू शकला नसाल, तर थांबा. तुम्हाला आम्ही एक हिंट देतो. या फोटोमध्ये समोरच दिसणाऱ्या व्हीलबॅरोवर झूम करा. या व्हीलबॅरोच्या बाजूने तुम्हाला एक छोटी शेपटी बाहेर आलेली दिसेल. ही शेपटी याच मांजराची आहे. म्हणजेच, हे मांजर व्हीलबॅरोच्या मागे दडलं आहे. बघा बरं परत जाऊन.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर