माणूसकी जिंदाबाद! होय, असंच म्हणावं लागेलं पुढील व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही तोंडातुन हे उद्गार बाहेर पडतील. असं म्हटलं जातं माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं म्हणजे माणूसकी पण, माणसासोबतच का? प्राण्यांसोबतही माणसाने माणूसकीनेच वागावं. काही माणसं याचा प्रत्यय वेळोवेळी आपल्या कृतीतून देत असतात. अशाच एका कृतीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ एका मांजरीचा आहे, जी तहानेनं अत्यंत व्याकूळ आहे. पाणी पिण्यासाठी ती नळाला तोंड लावून उभी राहते. पण नळ सुरु करणार कोण? तेव्हाच एक व्यक्ती त्याच्या मदतीला धावून येते. तो माणूस नळ उघडतो अन् त्यानंतर मांजर पाणी पिऊ लागते. जेव्हा तिची तहान भागते तेव्हा ती तिथून निघून जाते.
हा हृदयस्पर्शी व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये एक सुंदर गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलेय की, ‘दररोज, आपल्याला दयाभाव दाखवण्याच्या अनेक संधी मिळतात. आपल्याला फक्त त्या संधींवर कृती कराण्याची गरज असते'.
हा अवघ्या २३ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइक केले आहे आणि कमेंट्सही केल्या आहेत. लोकांनी कमेंट करत ही कृती कीती सुंदर आहे याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.